औसा येथील जि.प. शाळेत पालकांचा ऐतिहासिक कौल

औसा येथील जि.प. शाळेत पालकांचा ऐतिहासिक कौल; 
विष्णू फुलचंद पवार अध्यक्षपदी बिनविरोध — शालेय विकासाला नवी दिशा!
दिनांक १० जानेवारी २०२६ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ल.ता. औसा येथे शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीसाठी भव्य पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात पालक, ग्रामस्थ व शिक्षणप्रेमी नागरिकांच्या उपस्थितीत शालेय व्यवस्थापन समितीची सर्वानुमते निवड करण्यात आली. यामध्ये श्री. विष्णू फुलचंद पवार यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याने शाळेच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे.
या पालक मेळाव्यास माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत, शाळेतील स्वच्छता, मूलभूत सुविधा, गुणवत्ता वाढ आणि पालक–शिक्षक समन्वय यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. उपस्थित पालकांनी शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सहकार्य करण्याची भूमिका घेतली.
कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक श्री. येलशेट्टे एम. व्ही. तसेच सहशिक्षिका श्रीमती लोखंडे एस. एम. यांची उपस्थिती होती. नवनिर्वाचित समितीने विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला. शालेय व्यवस्थापन समिती – नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्य अध्यक्ष: विष्णू फुलचंद पवार उपाध्यक्ष: अर्जुन सुभाष राठोड सदस्य: सतीश माणिक राठोड, मीरा लहू राठोड, आशा सुरेश चव्हाण, सुमित्रा जोगदंड,अविनाश संजय राठोड, नेहा अक्षय चव्हाण नवनिर्वाचित अध्यक्ष व सर्व सदस्यांचे पालक, ग्रामस्थ आणि शिक्षकवर्गाकडून अभिनंदन करण्यात आले. शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होऊन विद्यार्थ्यांना अधिक सक्षम घडविण्याचे काम ही समिती करेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ