वाहतूक व दुचाकीस्वारास करावी लागत आहे कसरत
औसा - प्रतिनिधि
किल्ला ते पॉवर हाउस या रस्त्याच्या डांबरीकरण कामासाठी 2 कोटी रुपये खर्चण्यात आले आहेत. हे काम होन्यासाठी अनेक नागरिकांनी आमदार अभिमन्यू पवार यांच्या कडे तक्रारी केल्या होत्या तेंव्हा जाऊन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घातले व हा डांबरी रस्ता काम गेल्या जून - जुलै मध्ये जोमाने कामाला सुरुवात ही झाली आणि गुत्तेदाराने काही प्रमाणात काम करून हे काम बंद ही केले आता काल परवा झालेल्या पावसात या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत; यामुळे वाहनधारकांतुन संताप व्यक्त होत आहे.
जाणाऱ्या रस्त्यावर करण्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. हे काम औसा येथील ठेकेदारांकडून करण्यात आले. रस्त्यांचे काम होऊन तीन ते चार महिन्याचा कालावधी उलटला नाही तो पर्यंत रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडलेले दिसत आहेत रस्त्याचे काम हे निकृष्ट झाले असल्याचे या रस्त्यावर ये- जा करणाऱ्या लोकांतून बोलले जात आहे
महावितरण कार्यालय रस्त्यावर आणि पुलाजवळ अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत.
अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर किल्ला - पॉवर हाउस रस्त्यांचे काम सुरू असताना हे काम मी अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याने रस्त्यांचे काम दर्जेदार व्हावे यासाठी शहरातील राजकीय ,सामाजिक कार्यकर्ते हे पुढाकार घेतील का असा सवाल सर्वसामान्यातून विचारला जात आहे
जागोजागी रस्ता उखडल्याने कामाच्या गुणवत्तेवर आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यावर विविध शंका व्यक्त केल्या जात आहेत.
दरम्यान, किल्ला - पॉवर हाउस रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यरत अधिकाऱ्यांना आम्ही दिली आहे. याकडे सार्वजनिक विभागाच्या उपविभागीय अभियंत्यांनी तातडीने लक्ष देऊन खड्डे बुजविण्यासाठी सूचना कराव्यात, अशी मागणी वाहनधारकासह, होत आहे.
किल्ला - पॉवर हाउस या रस्त्यावर पडलेले खड्डे सार्वजनिक बांधकाम विभागाने गुत्तेदाराकडुन भरून घ्यावेत; तसेच रस्त्याच्या दुतर्फा कडेला वाढलेली काटेरी झुडपे काढुन साईड पट्ट्या खुल्या कराव्यात. असे मत या परिसरातील अनेक नागरिकांनी दैनिक "त्रिशक्ती " शी बोलताना व्यक्त केले.
पावसाळा असल्यामुळे व गेल्या महिन्यात गुत्तेदार यांचे उपोषण असल्यामुळे काम पूर्ण झाले नाही ते काम आम्ही त्वरित करून घेऊ
- ____
रोहन जाधव व अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग औसा_
0 टिप्पणियाँ