चमकली असदुल्ला खान शाळेची विद्यार्थ्यांची क्रीडा कामगिरी!

चमकली असदुल्ला खान शाळेची विद्यार्थ्यांची क्रीडा कामगिरी!
सोलापूर :
डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल अँड कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, सोलापूरच्या विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे.

एअर पिस्तूल शूटिंग स्पर्धेत इयत्ता ६ वीचा विद्यार्थी सुवेज सिराज तांबोळी याने सुवर्ण संकल्प स्पोर्ट्स शूटिंग क्लब, वेलापूर येथे झालेल्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला.

तर इयत्ता ९ वीचा उजेर अफरोज सय्यद व इयत्ता १० वीचा अल्तमाश अफरोज सय्यद यांनी तालुका स्तरीय तायक्वाँडो स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी आपली पात्रता सिद्ध केली आहे.

या यशाबद्दल प्राचार्य मो. साकीब सय्यद, संस्थापक व विश्वस्त डॉ. असदुल्ला खान, विश्वस्त सादुल्ला खान व इबादुल्ला खान यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. त्यांनी शाळा शैक्षणिक, क्रीडा व व्यक्तिमत्त्व विकासाच्या सर्व क्षेत्रांत आघाडीवर राहील, असा विश्वास व्यक्त केला.

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ