औसा शहरात मुसळधार पावसामुळे घराची भिंत कोसळली गरीब कुटुंब उघड्यावर _

औसा शहरात मुसळधार पावसामुळे घराची भिंत कोसळली 
 गरीब कुटुंब उघड्यावर – शासनाकडून मदतीची गरज

 दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 8.30 वाजता औसा शहरातील केवळराम गल्ली, पठाण वाडा येथे जोरदार पावसामुळे असद वजीर पठाण यांच्या घराची भिंत कोसळली.

या दुर्घटनेत त्यांच्या आई झोपेत असताना भिंत कोसळून त्यांच्यावर पडली. सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी त्या जखमी झाल्या असून उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे घराचे मोठे नुकसान झाले आहे.

सदर कुटुंब अत्यंत गरीब असून रोजंदारीवर गुजराण करणारे आहे. या घटनेमुळे त्यांचे राहते घर उद्ध्वस्त झाले आहे. पावसाळ्याच्या दिवसात त्यांना उघड्यावर राहावे लागणार असल्याने तातडीने शासन व स्थानिक प्रशासनाकडून मदत मिळावी अशी मागणी होत आहे.

सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी देखील पुढाकार घेऊन या गरीब कुटुंबाला मदतीचा हात द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ