उपप्रादेशिक परिवहन कार्यालय लातूरचा भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर वाहनधारकां मधून संतापाची लाट ..!!

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय लातूरचा भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर वाहनधारकां मधून संतापाची लाट ..!!!

लातूर प्रतिनिधी :

उप प्रादेशिक परिवहन कार्यालय लातूर मधील भ्रष्टाचाराचे धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहेत. ओव्हरलोड वाहनधारकांकडून दलालामार्फत सर्रास वसुली केली जात असल्याचे गंभीर आरोप वाहनधारकांनी केले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, एका वाहनाकडून दर महिन्याला तब्बल २८०० रुपयांची मंथली घेतले जातात. एवढेच नव्हे तर असे अनेक वाहनधारक दलालांच्या मार्फत वसुलीच्या जाळ्यात अडकलेले असल्याचे उघड झाले आहे.

नियमांचे पालन करणाऱ्या प्रामाणिक वाहनधारकांना अधिकाऱ्यांकडून छळ, अवाजवी दंड आणि चौकशीचा त्रास सहन करावा लागत आहे. तर दुसरीकडे, नियम मोडणाऱ्यांना दलालांच्या छत्रछायेखाली संरक्षण मिळत असल्याने भ्रष्टाचाराची साखळी अधिक बळकट होत आहे.

या गैरप्रकारामुळे प्रामाणिक वाहनधारकांमध्ये प्रचंड संतापाची लाट आहे. “आमच्याकडून पैसे वसुली न केल्यास धाक दाखवून नोटिसा आणि कारवाई केली जाते. त्यामुळे नाईलाजास्तव दलालांकडे पैसे द्यावे लागतात”, असा आरोप वाहनधारकांनी केला आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी व दलालांवर कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणी वाहनधारकांकडून होत आहे.

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ