औसा तालुक्यात उजनी परिसरात अतिवृष्टीचा कहर; जनजीवन विस्कळीत

औसा तालुक्यात उजनी परिसरात अतिवृष्टीचा कहर; जनजीवन विस्कळीत
लातूर : औसा तालुक्यातील उजनी परिसरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. नदी-नाले तुडुंब भरून वाहत असून, अनेक शेतजमिनी व उभी पिके पाण्याखाली गेली आहेत. यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

फक्त शेतीच नव्हे, तर गावातील घरांमध्येही पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल सुरू आहेत. श्मशानभूमी आणि कब्रस्तान देखील जलमय झाले असून, त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पीडित ग्रामस्थ शासन आणि प्रशासनाकडून तात्काळ मदतीची अपेक्षा करत आहेत. मात्र, अद्याप ठोस मदत पोहोचली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ