आझाद ग्रुपने केली इतिहास रचणारी सुरुवात – DJ बंद करून सीरतुन्नबी ﷺ ला दिला मान!"
कलम : प्रतिनिधि
आझाद ग्रुपच्या तरुणांनी रबिउल अव्वलच्या मुबारक महिन्यात घेतलेला इतिहास घडवणारा निर्णय सर्वत्र कौतुकास पात्र ठरत आहे. या वर्षी कलम शहरात रबिउल अव्वलच्या स्वागतासाठी DJ न लावता, मुलांसाठी सीरतुन्नबी ﷺ प्रश्नोत्तर स्पर्धा आयोजित करण्यात आली. या पवित्र उपक्रमाचे कौतुक करत मुफ़्ती फारुक साहेबांनी आझाद ग्रुपला आपल्या खास अंदाजात शुभेच्छा व दुआ दिली.
मुफ़्ती साहेबांनी आपल्या संदेशात म्हटले आहे की, "तुम्ही फक्त DJ मशीन बंद केली नाही, तर शैतानाचा दरवाजा बंद केला आहे.खरी खुशाली गुनाहाच्या दलदलीत नाही तर सुन्नतीच्या प्रकाशात आहे. इश्के रसूल कधीच DJ चा मोहताज नसतो."
त्यांनी पुढे स्पष्ट केले की, आझाद ग्रुपने दाखवलेला हा मार्ग संपूर्ण उम्मतला एक दिशा देणारा आहे. हा निर्णय सांगतो की, रसूल ﷺ ची मोहब्बत ही केवळ जिभेवर नाही तर अमलात उतरवायची असते.
मुफ़्ती फारुक यांनी तरुणांना आवाहन केले की,
"जर संपूर्ण उम्मत DJ बंद करून कुरआनचा पैगाम पोहोचवेल, यतीमांचे डोळे पुसतील, गरीबांच्या चुली पेटवतील, मुलांना शिक्षण देतील आणि मसाजिद-मदारिसची खिदमत करतील, तर हीच खरी रबिउल अव्वलची खुशाली ठरेल."
त्यांनी भावनिक शब्दांत प्रश्न उपस्थित केला की,
"आपल्या नबी ﷺ च्या जन्मदिनी आपण DJ आणि शोरगुल करू का?
की कुरआन, दरूद आणि नमाज अदा करून खरी मोहब्बत दाखवू?
कयामतच्या दिवशी जर नबी ﷺ विचारतील – माझ्या जन्माची खुशाली कशी साजरी केली? – तेव्हा आपल्याकडे काय उत्तर असेल?"
शेवटी मुफ़्ती फारुक यांनी आझाद ग्रुपचे अभिनंदन करत दुआ दिली की,
"अल्लाह तआला तुम्हाला जग आणि आखेरत दोन्ही ठिकाणी सर्वोत्तम बदला देवो. आणि कलम शहरातील सर्व नागरिक DJ पासून परहेज करून खऱ्या अर्थाने सुन्नती मार्ग स्वीकारतील."
0 टिप्पणियाँ