आगामी निवडणुकांसाठी ए आय एम आय एम पक्ष सज्ज!

आगामी निवडणुकांसाठी ए आय एम आय एम पक्ष सज्ज!
 औसा तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्याशी विशेष बैठक

औसा प्रतिनिधि ....
तौफिक सत्तार कुरेशी.... 
औसा तालुक्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ए आय एम आय एम (AIMIM) पक्षाने जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. औसा तालुक्यातील ए आय एम आय एम पदाधिकाऱ्यांचे एक शिष्टमंडळ नुकतेच ए आय एम आय एमचे प्रदेशाध्यक्ष तथा लोकसभेचे माजी खासदार इम्तियाज जलील यांची आणि महाराष्ट्र प्रदेश सचिव समीर साजिद बिल्डर यांची औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) येथील कलेक्टर ऑफिसजवळील प्रदेश कार्यालयात भेट घेण्यासाठी गेले होते.

या भेटीत आगामी नगर पालिका, नगर पंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये ए आय एम आय एम पक्ष पूर्ण ताकदीने उतरेल आणि औसा तालुक्यात पक्ष अधिक बळकट करण्यात येईल, यावर सखोल चर्चा झाली.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी  ए आय एम आय एम औसा तालुका प्रमुख ॲड. गफरुल्लाह हाश्मी  त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, "औसा तालुक्यात ए आय एम आय एम पक्ष सक्षम आणि सज्ज असून, पक्ष वाढीसाठी जे काही करता येईल, ते सर्वतोपरी प्रयत्न करून आम्ही पक्षाच्या विचारधारेचा विस्तार करू" असे सांगितले

 प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांचे आश्वासन:

बैठकीदरम्यान प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी यासंदर्भात महत्त्वाचे आश्वासन दिले —
"लवकरच लातूर जिल्ह्यात भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात येईल आणि आगामी निवडणुकांची स्पष्ट भुमिका रणनीती आखली जाईल असे या बैठकीत त्यांनी आपले मत व्यक्त केले. या मेळाव्याच्या तारखा लवकरच जाहीर केल्या जातील."

बैठकीस उपस्थित मान्यवर –

 औसा तालुका प्रमुख – ॲड. गफरुल्लाह हाश्मी
 शहर प्रमुख – सय्यद कलीम
 कोषाध्यक्ष – शकील देशमुख
सक्रिय कार्यकर्ते – रहीम महेताब तांबोळी, सय्यद जैद कलीम
 तसेच अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 विविध विषयांवर चर्चा –

या बैठकीत फक्त निवडणुकीचा विषयच नव्हे तर,
🔸 औसा तालुक्यातील विकास,
🔸 पक्षाचे संघटनात्मक मजबुतीकरण,
🔸 तरुण कार्यकर्त्यांना नेतृत्वाच्या संधी
या विषयांवरही चर्चा झाली. औसा तालुक्याला एमआयएमसाठी एक बुरुज बनवण्याच्या उद्देशाने पक्ष स्तरावर सखोल विचारविनिमय झाला.

 नव्या उर्जेसह एमआयएम पुढे!

या भेटीमुळे एमआयएम कार्यकर्त्यांमध्ये एक नवचैतन्य निर्माण झाले असून, आगामी निवडणुकांना सामोरे जाण्याची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. औसा तालुक्यातील राजकीय समीकरणे आता एमआयएमच्या सक्रियतेमुळे बदलण्याची शक्यता आहे.

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ