निष्ठावंत पत्रकारितेचा आदर म्हणजेच सशक्त लोकशाहीचा आधार

निष्ठावंत पत्रकारितेचा आदर म्हणजेच सशक्त लोकशाहीचा आधार

 लातूर | दि. २२ जुलै २०२५

लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अमोल श्री. तांबे (भा.पो.से.) यांची सदिच्छा भेट दिनांक २२ जुलै रोजी घेण्यात आली. या भेटीत पत्रकारितेचे समाजातील महत्व व लोकशाहीतील योगदान यावर सकारात्मक चर्चा घडून आली.

श्री. तांबे यांनी पत्रकारितेला "लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ" म्हणत समाज माध्यमांवर सकारात्मक दृष्टिकोनातून कार्य करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, सत्याशी निष्ठावान आणि राष्ट्रहितासाठी जागरूक असलेली पत्रकारिता हीच सशक्त लोकशाहीचे भविष्य आहे.

प्रसिद्ध माध्यमांमार्फत समाजात जबाबदारीने माहितीचा प्रसार, जनजागृती आणि योग्य विचारांची निर्मिती हे पत्रकारांचे कार्य असल्याचे त्यांनी नमूद केले.

लातूर जिल्हा पोलिस अधीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर श्री. तांबे हे कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जनतेशी थेट संवाद साधून कार्यरत राहतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

ही सदिच्छा भेट अत्यंत सकारात्मक आणि प्रेरणादायीq ठरली.

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ