गटारीतच जनजीवन! निलंगा शहरातील खटिक गल्लीचा विदारक चेहरा उघड!
निलंगा प्रतिनिधी
अनवर यूसुफ कुरेशी
निलंगा शहरातील खटिक गल्ली भागात सध्या जनतेचं जीवन अक्षरशः नरकयातना भोगत आहे. गल्लीच्या मध्यभागी असलेल्या सांडपाण्याच्या गटाराची अवस्था इतकी भीषण झाली आहे की, रस्ता ओळखू येणार नाही असा गटारात बुडालेला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून सांडपाणी भरून राहिलं असून, दुर्गंधीमुळे आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. नागरिक दररोज हा रस्ता ओलांडताना जीव मुठीत घेऊन चालत आहेत.
प्रशासनाने वारंवार तक्रारी करूनही दुर्लक्ष केलं जात आहे. ना स्वच्छतेची व्यवस्था, ना सांडपाण्याचा निचरा!
स्थानिकांनी सांगितले की, "नाल्याचा दुर्गंध आणि मच्छर यामुळे लहान मुलं, वृद्ध यांना त्रास होत आहे. शाळा, मशिद, घरे सगळं गटाराच्या कडेला आहे – आणि प्रशासन केवळ आश्वासने देत आहे!"
“जर लवकरच उपाय केला गेला नाही, तर आंदोलन हा एकमेव पर्याय राहील,” असे संतप्त नागरिकांनी स्पष्टपणे बजावले.
बातमीसह दिलेल्या फोटोमध्ये स्पष्टपणे दिसते की, स्थानिकांनी दोर बांधून लोकांना मार्गदर्शन करत गटार पार करत आहेत. हा प्रकार म्हणजे प्रशासनाच्या अपयशाची जिवंत साक्ष आहे.
*प्रशासनाच्या झोपेचं सरकारला जागं करण्यासाठी ही बातमी शेअर करा!*
0 टिप्पणियाँ