उपविभागीय पोलिस अधिकारी कुमार चौधरी यांची धाडसी कारवाई – जिल्ह्यात सर्वत्र कौतुकाचा वर्षाव

शालेय पोषण आहारातील तांदूळाचे दोन आयशर औसा उपविभागीय अधिकारी यांनी पकडल्या .

उपविभागीय पोलिस अधिकारी कुमार चौधरी यांची            धाडसी कारवाई – जिल्ह्यात सर्वत्र कौतुकाचा वर्षाव
 तोफिक सत्तार कुरेशी

 शालेय पोषण आहाराचा तांदूळ काळ्या बाजारात! दोन आयशर गाड्या पकडल्या
औसा : लहान मुलांच्या हक्काचा शालेय पोषण आहाराचा तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असताना औसा पोलिसांनी धाडस दाखवत दोन आयशर गाड्या जप्त केल्या. शासनाच्या योजनेंतर्गत मुलांसाठी येणारा तांदूळ सरळ बाजारात जात असल्याचा पर्दाफाश होताच जिल्ह्यात संतापाची लाट उसळली.

मात्र, या कारवाईमुळे औसा पोलिसांचे जिल्हाभर कौतुक होत आहे. नागरिकांनी “अशा धाडसी कारवाया झाल्या पाहिजेत, तेव्हाच गरीब मुलांचा हक्क वाचेल” अशा प्रतिक्रिया दिल्या.

नागरिकांचा सवाल मात्र कायम आहे — “फक्त गाड्या पकडून भागणार नाही, या घोटाळ्याचा सूत्रधार तुरुंगात गेला पाहिजे.”
जिल्हा पोलीस अधीक्षक लातूर यांच्या मार्गदर्शनाखाली औसा.कुमार चौधरी उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी केली कारवाई

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ