ईद-ए-मिलादुन्नबी जुलूस कमिटीची शांततेत निवडणूक पूर्ण – हाजी मंजूर कुरेशी अध्यक्षपदी"

ईद-ए-मिलादुन्नबी जुलूस कमिटीची शांततेत निवडणूक पूर्ण – हाजी मंजूर कुरेशी अध्यक्षपदी"
कळंब प्रतिनिधि 
बिलाल कुरेशी

कळंब तालुक्यातील शिराढोण येथे दिनांक 31 ऑगस्ट 2025 रोजी ईद-ए-मिलादुन्नबी जुलूस कमिटीची बैठक उत्साहात आणि शांततेच्या वातावरणात संपन्न झाली. हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती उत्सवाच्या जुलूसाच्या आयोजनासाठी झालेल्या या बैठकीत हाजी मंजूर कुरेशी यांची अध्यक्षपदी,अब्दुल सलाम समद डांगे यांची उपाध्यक्षपदी तर इस्माईल कुरेशी यांची सचिवपदी एकमताने निवड करण्यात आली.

बैठकीस कमिटीचे सदस्य अजिज आतार, बाबा खतीब, साबेर कुरेशी, फिरोज कुरेशी, खय्युम कुरेशी, नियोजुद्दीन शेख, इकबाल तांबोळी, आयात डांगे, नसिर कुरेशी यांची विशेष उपस्थिती होती. मार्गदर्शक म्हणून  आयुब भाई कुरेशी राजु भाई डांगे, शकील डांगे, ,  एजाज डांगे यांनी सहभाग नोंदवला.

या बैठकीनंतर नव्याने निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांनी शिराढोण पोलीस ठाण्याचे निरीक्षक धरणीदर कोळेकर यांना जुलूसासाठी आवश्यक परवानगीबाबत निवेदन सादर केले.

कार्यक्रमाची संपूर्ण प्रक्रिया शांतता, बंधुता आणि ऐक्याच्या वातावरणात पार पडल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ