शिराढोण ग्रामपंचायतीकडून ग्रामविकास मंत्रींकडे सभागृह बांधकामासाठी मागणी
शिराढोण (ता. कळंब, जि. धाराशिव)
शिराढोण ग्रामपंचायत तर्फे ग्रामविकास मंत्री मा. जयकुमार गोरे साहेब यांच्याकडे नागनाथ महाराज मठ येथे सभागृह बांधकामासाठी निधी मंजूर करावा अशी अधिकृत मागणी करण्यात आली आहे.
ग्रामपंचायत कार्यालय शिराढोणच्या सरपंच सौ. लक्ष्मीताई म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन सादर करण्यात आले.
निवेदन देताना माजी ग्रामपंचायत सदस्य पवन दिलीप म्हेत्रे (जिल्हाचिटणीस, भारतीय जनता युवा मोर्चा, जिल्हा धाराशिव), तसेच दिपक माळी उत्तम बालटे साहेब व रवी गोरे उपस्थित होते.
गावातील नागनाथ महाराज हे माळी समाजाचे श्रद्धास्थान असून दरवर्षी हजारो भाविक दर्शनासाठी येथे येतात. धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना योग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी सभागृहाची उभारणी होणे अत्यंत आवश्यक असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
या सभागृहासाठी 20 लाख रुपयांचा निधी मंजूर करून द्यावा, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्यांनी मंत्र्यांकडे केली.
गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, "सभागृह उभारणीमुळे सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक कार्यांना मोठी चालना मिळेल तसेच शिराढोण गावाच्या विकासाला नवी दिशा मिळेल."
0 टिप्पणियाँ