दादासाहेब फाळके आयकॉन अवॉर्डस च्या कार्यालयात मा. खा. डॉ सुनील ब गायकवाड यांचा सत्कार
मुंबई -(विशेष प्रतिनिधी)
दादासाहेब फाळके आयकॉन अवॉर्ड च्या कार्यालयात लातूर चे माजी खासदार संसदरत्न प्रोफेसर डॉ सुनील बळीराम गायकवाड यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली. संस्थेचे संचालक प्रसिद्ध फिल्म अभिनेता तथा गरिबोके ॲक्टर या नावानी ओळखले जाणारे कल्याण जी जाना यांनी कार्यालयात डॉ सुनील बळीराम गायकवाड यांचा सत्कार केला.
डॉ सुनील बळीराम गायकवाड यांनी कल्याण जी जाना यांनी लॉकडाऊन च्या काळात मुंबई मधे मोफत भोजन दान दिले . कल्याण जी सामाजिक कार्य करतात मुंबई मध्ये रोटी कपडा बँक ही चालवतात लोकांना जेवण आणि कपडे मोफत वाटण्याचं काम करतात. अनेक समाज उपयोगी काम करतात त्यांचे कौतुक लातूर चे माजी खासदार डॉ सुनील बळीराम गायकवाड यांनी केले आणि त्यांच्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या.
के जे स्टुडिओ मुंबई या त्यांच्या कार्यालयात कल्याण जी जाना यांनी काही कलाकार सोबत बैठक करून काही विषया वर सविस्तर चर्चा केली. फिल्म इंडस्ट्रीत नव्यानं येणाऱ्या ना योग्य मार्गदर्शन मिळाले पाहिजे या साठी वेगवेगळे कार्यक्रम संस्थेच्या माध्यमांतून केले जातात.
कार्यक्रमाला फिल्म अभिनेता ताहीर कमाल खान,निर्माता दिग्दर्शक रइस खान,तमिळ अभिनेता नदीम, भेरू जैन उपस्थित होते.
0 टिप्पणियाँ