प्रजासत्ताक दिनानिमित्त औसा येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न

प्रजासत्ताक दिनानिमित्त औसा येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न

औसा :- आज २६ जानेवारी रोजी "प्रजासत्ताक दिना" निमित्त "विवेकानंदा मिशन चॅरिटेबल ट्रस्ट,औसा आणि नरेंद्रा मॅथ्स अकॅडमी व फिनिक्स सायन्स क्लासेस,औसा च्या संयुक्त विद्यमाने आयोजित "भव्य रक्तदान शिबीर" शहरातील मारुती मंदिर,बस स्थानक शेजारी,औसा येथे पार पडले यामध्ये १०५ रक्तदात्यांनी रक्तदान हे अनमोल कार्य करून सामाजिक बांधिलकी राखत गरजु रुग्णांची मदतच केली आहे.

या कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून "पहिल्या रक्तदात्याच्या हस्ते दिपप्रज्वलण" करून झाली...तरी रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान करून सामाजिक बांधिलकी जपलेल्या सर्व रक्तदात्यांचे शतशः आभार..तसेच कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांचे,ब्लडबँक च्या सर्व कर्मचाऱ्यांचे,सर्व क्लासेस च्या शिक्षक,विद्यार्थी,त्यांचे पालक,कळत-नकळत मदत केलेल्या सर्व मित्रपरिवाराचे व ट्रस्ट च्या सर्व सहकारी यांचे ट्रस्टच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ