येडेश्वरी भाविकांची येडशी टोल नाक्यावर लूट ?ट्रॅफिक पोलिसांच्या कारवाईवर सवाल; ‘तपासणी की त्रास ? असा प्रश्न

येडेश्वरी भाविकांची येडशी टोल नाक्यावर लूट ?
ट्रॅफिक पोलिसांच्या कारवाईवर सवाल; ‘तपासणी की त्रास ? असा प्रश्न
येडशी, प्रतिनिधी

येडेश्वरी देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने निघालेल्या भाविकांना येडशी टोल नाक्यावर अडवून ट्रॅफिक पोलिसांकडून कारवाईच्या नावाखाली त्रास दिला जात असल्याचे गंभीर आरोप समोर आले आहेत. या प्रकारामुळे भाविकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, टोल नाक्यावर काही वाहनांना थांबवून त्यांच्या कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. मात्र, ही कारवाई निवडक वाहनांवरच होत असल्याचे सांगितले जात असून, काही भाविकांनी “अनावश्यक दंड वसूल केला जात आहे” असा आरोप केला आहे.
घटनास्थळी उपस्थित नागरिकांच्या म्हणण्यानुसार, दर्शनासाठी निघालेल्या भाविकांना वारंवार अडवून त्यांच्या प्रवासात अडथळे निर्माण केले जात आहेत. त्यामुळे वेळेचा मोठा विलंब होत असून, अनेक भाविकांनी याबाबत प्रशासनाकडे औपचारिक तक्रार करण्याचा इशारा दिला आहे.
या पार्श्वभूमीवर “ही कारवाई की वसुली?” असा सवाल उपस्थित होत असून, संबंधित विभागाच्या भूमिकेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य समोर आणावे तसेच भाविकांना होणारा त्रास तात्काळ थांबवावा, अशी मागणी नागरिक व भाविकांकडून जोर धरत आहे.

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ