रौजतुल मोमिनात’ मदरशाला उलेमा व हुफ्फाज यांची सदिच्छा भेट

‘रौजतुल मोमिनात’ मदरशाला उलेमा व हुफ्फाज यांची सदिच्छा भेट
 मदरशातील दर्जेदार शिक्षण, शिस्तबद्ध वातावरण व संस्कारक्षम शिक्षणपद्धत

औसा : प्रतिनिधी 
तौफीक सत्तार कुरेशी 

औसा :  तालुक्यातील लामजना येथील रौजतुल मोमिनात’ मदरशाला उलेमा हुफ्फाज व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी सदिच्छा भेट देत मदरशाची पाहणी केली. यावेळी मदरशामधील विद्यार्थ्यांचे शिक्षण, वर्गखोल्या, शिस्तबद्ध वातावरण, इस्लामी संस्कार व शिक्षणाची गुणवत्ता यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.  मदरशातील विविध वर्ग, विद्यार्थ्यांची शिक्षणपद्धती तसेच धार्मिक व नैतिक शिक्षणाची व्यवस्था पाहण्यात आली. विद्यार्थ्यांची शिस्त, अभ्यासातील सातत्य आणि मदरशातील सकारात्मक वातावरण पाहून सर्वांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी मदरसा प्रमुख मुफ्ती अब्दुल वाजिद साहेब यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत इस्लामी शिक्षणाचे महत्त्व, समाजातील मदरशांची भूमिका आणि भावी पिढीला सुसंस्कारित घडविण्याचे कार्य याविषयी मोलाचे विचार मांडले. त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाने उपस्थितांच्या मनावर सकारात्मक ठसा उमटला.

आजच्या आधुनिक युगात धार्मिक शिक्षणासोबतच नैतिक मूल्ये जोपासणाऱ्या अशा मदरशांचे अस्तित्व ही समाजासाठी अभिमानाची बाब असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.  मदरशामध्ये दिले जाणारे शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतले जाणारे प्रयत्न अत्यंत कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी सांगितले. या भेटीप्रसंगी न्यूज 24 लातूर चे मुख्य संपादक हाफिज तौफिक कुरेशी, वंचित बहुजन आघाडीचे औसा तालुका अध्यक्ष हाफिज ताहेर कुरेशी यांच्यासह औसा तालुक्यातील अनेक उलेमा, हुफ्फाज व मान्यवर उपस्थित होते.

मदरसे म्हणजे केवळ शिक्षणाची केंद्रे नसून, संस्कार, चारित्र्य आणि मानवतेची जपणूक करणारी पवित्र विद्यापीठे आहेत. अशा संस्थांचे कार्य समाजाला उज्ज्वल भविष्याकडे नेणारे दीपस्तंभ ठरत आहे असे मत नाझीम मुफ्ती अब्दुल वाजिद यांनी व्यक्त केले.

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ