जातीयवादी लिंगपिसाट नाराधमाने केला बौद्ध महिलेचा केला विनयभंग
ऑट्रोसिटी दाखल
निलंगा प्रतिनिधी : -फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा वारसा चालवणाऱ्या पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात आजही मागास समाजातल्या महिला सुरक्षित नसल्याचा प्रकार नुकताच मौजे दादगी ता निलंगा जिल्हा लातुर येथे घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,मौजे दादगी ता.निलंगा जिल्हा लातुर येथील मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाची उपजीविका भागविणाऱ्या विवाहित महिलेचा दिर केशव गायकवाड हे गावातीलच लिंबराज रंगराव जाधव यांच्या शेतात सालगडी म्हणून काम करतात दि.११जानेवारी२०२२ रोजी सकाळी ०९ वाजेच्या सुमारास मजुरीने लिंबराज रंगराव जाधव यांच्या शेतात कांदे लावण करण्याच्या कामासाठी मजुरीने बोलावण्यात आले होते.
म्हणून सदर पिडीत महिला ही तिच्या इतर सहकारी महिलांसह सर्वजणी मिळून लिंबराज रंगराव जाधव यांच्या शेतात कामासाठी गेल्या होत्या.शेतमालक लिंबराज जाधव यांच्या शेतात सालगडी म्हणून असलेले केशव गायकवाड यांनी शेतातील पत्र्याच्या शेडजवळ असलेले कांद्याचे रोप काढण्याचे काम सांगितले.व ते पण बाजूस असलेल्या शेतात कुळव मारण्याचे काम करू लागले होते.पीडित महिला व त्यांच्या सोबत असलेल्या महिलांनी दुपारी अंदाजे साडेतीन वाजनेच्या सुमारास रोप लावण्याचे काम पूर्ण केले.तेंव्हा पीडित महिलेच्या दिराने मजुरीने आलेल्या महिलांना शेतात करळ वेचण्यासाठी बाजूच्या शेतात पाठवून दिले होते.पीडित महिला व तिचा दिर दोघेजण राहिलेले कांद्याचे रोप परत शेडमध्ये ठेवण्यासाठी पोत्यात भरले नंतर पीडित महिलेच्या दिराने कांद्याने भरलेले पोते शेडमध्ये ठेवा असे सांगून पीडित महिलेचा दिर बैलांना पाणी पाजून आणतो म्हणून बैलांना घेऊन दूर निघून गेले यावेळी अंदाजे चार वाजण्याच्या दरम्यान लिंबराज रंगराव जाधव यांचा चुलत भाऊ नामे प्रताप किसन जाधव रा दादगी हा पीडित महिलेच्या जवळ येऊन हाताला धरून जातीयवाचक शब्दप्रयोग करून तुला पाचशे रुपये देतो थोडं ज्वारीच्या पिकात चल म्हणून वाईट उद्देशाने हाताला धरून ओढाओढी करू लागला त्याच वेळेस पीडित महिलेने आरडाओरड केल्याने तो आवाज पीडित महिलेच्या दिराने ऐकला व तो तात्काळ त्याठिकाणी आला व आरोपी प्रताप जाधव यास तुम्ही असे काय करता म्हणून जाब विचारला तेंव्हा आरोपी प्रताप जाधव याने अर्वाच्य जातीयवाचक शिवीगाळ करून पीडितेच्या दिरास हातातील कुऱ्हाडीच्या दांड्याने डोक्यात जोरात मारून डोके फोडून जखमी केले. यावेळी पीडित महिलेचा दिर सोडवणूक करण्यास गेला असता हा प्रकार घडला नंतर आजूबाजूचे लोकांना आवाज गेल्याने मजुरीने काम करीत असलेल्या महिला तिथे आल्या यामुळे आरोपी प्रताप जाधव यांनी पिडीत महिला व तिच्या दिरास तुला जिवंत ठेवणार असे म्हणून जातीयवाचक शिवीगाळ करून तो तिथून निघून गेला.
नंतर पीडित महिला व तिचा पीडित दिर निलंगा येथे येऊन वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी निलंगा पोलीस ठाण्यात येऊन सदर घटनेबाबत योग्य तो पाठपुरावा केल्यानंतर रितसर फिर्याद नोंदवण्यात आली यावरून निलंगा पोलीस ठाण्यात रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला असून निलंगा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ००१५/२०२२ कलम भादवी ३५४(a)३२४,२९४,५०६.
अ.जा.ज.अत्याचार प्रतिबंधक कायदा ३(१)(R),३(१)(s),३(१)(w)(ii),३(२)(va)नुसार गुन्हे दाखल असून पुढील तपास डी वाय एस पी डॉ. दिनेशकुमार कोल्हे करीत आहेत.आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागला नाही...?
0 टिप्पणियाँ