लातुरात ऑटो चालकाकडून पत्रकाराला मारहाण पोलिसाकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ अखेर वरिष्ठांच्या हस्तक्षेपा नंतर हालचाल
लातूर/प्रतिनिधी
लातुरात ऑटो चालकाकडून पत्रकार तम्मा पावले यांना जुना रेणापूर भाग परिसरामध्ये मारहाण झाल्याची घटना रविवार दिनांक 16 जानेवारी रोजी रात्री साडे आठ च्या सुमारास घडली. या मारहाणीची तक्रार देण्यासाठी तम्मा उर्फ नारायण पावले हे शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गेले असता, प्रथम पोलिसांनी याबाबत टाळाटाळ केली. सोशल मीडियावर पोलिसांच्या या कार्याच्या विरोधात जोरदार अक्षेप घेण्यात आला. त्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार तम्मा नारायण पावले यांच्या तक्रारीची दखल घेऊन त्यांना तात्काळ वैद्यकीय उपचारासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. रात्री उशिरापर्यंत ऑटो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
लातूर येथील मुक्त छायाचित्रकार अनलायझरचे पत्रकार तम्मा उर्फ नारायण पावले हे वृत्तपत्रीय छायाचित्रणाच्या कार्यासाठी लातूर शहरात गेले असताना त्यांना रविवार दिनांक 16 जानेवारी रोजी रात्री नऊच्या सुमारास शहरातील एका ऑटो चालकाकडून विनाकारण मारहाण करण्यात आली. त्यांना जुन्या रेणापूर नाक्याकडे घेऊन जाऊन तेथे अँटो चालकाने आपल्या अन्य साथीदार यांना बोलावून पावले यांना मारहाण केली. यावर पावले आणि काही पत्रकारांकडून या मारहाणीची तक्रार शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यासाठी गेले. यावेळी प्रथम त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. यावर सोशल मीडियावर पत्रकारांनी हा विषय लावून धरल्यावर वरिष्ठांकडून याबाबत तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे निर्देश शिवाजीनगर पोलिस ठाण्यात देण्यात आली. त्यानंतर मारहाण झालेले नारायण पावले यांना वैद्यकीय उपचारासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. वैद्यकीय उपचारानंतर पावले यांची तक्रार नोंदवली जाणार असल्याची माहिती शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून रात्री उशिरा देण्यात आली आहे.
0 टिप्पणियाँ