मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे शैक्षणिक , व्यवसायिक कर्ज थेट वाटप करा व व 500 कोटीचे निधी त्वरीत देणे बाबत Aimim चे निवेदन



मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे शैक्षणिक , व्यवसायिक कर्ज थेट वाटप करा व  व 500 कोटीचे निधी त्वरीत देणे बाबत Aimim चे निवेदन 

*एस ए काझी* 
 प्रतिनिधी
औसा :- Aimim च्या वतीने विविध विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री व अर्थमंत्री यांना देण्यात आले आहे निवेदनात म्हटले आहे.

गेल्या आठ वर्षापासुन मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे सर्व योजना बंद आहेत ते सुरु करण्यात यावेत . शैक्षणिक व्यावसायिक कर्ज , थेट कर्ज नव्याने सुरु करण्यात यावेत व प्रत्येकी विनाअट दोन लाख कर्ज वाटप करण्यात यावे ,  कोरोना काळात व्यापारी व विद्यार्थी चे जास्त नुकसान झाले आहे ते नुकसान भरून यासाठी योग्य ते उपाययोजना करण्यात याव्यात .

 त्याकरीता आम्ही खालील प्रमाणे मागण्या करीत आहोत .

 1. मौलाना आझाद महामंडळला 500 कोटी अनुदान तरतूद करण्यात यावी .

 2. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात 15 कलमी अल्पसंख्यांक कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्यात यावी . तसेच जिल्हा नियोजन बैठकीत आढावा घेण्यात यावा .

 3 . मौलाना आझाद महामंडळाची कार्यकारणी तयार करण्यात यावी व अल्पसंख्यांक आयोग स्थापन करण्यात यावे.

 4. अल्पसंख्यांक बहुल शहराचा निधी मागील 8 वर्षापासुन देण्यात आलेला नाही . तो तात्काळ देण्यात यावे

 5. मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने शैक्षणिक व बिन व्याजी भांडवल , वाहनकर्ज योजनाच्या माध्यमातून थेट कर्ज वाटप करण्यात यावेत . तरी आमच्या मागण्या त्वरीत मान्य करण्यात याव्यात अन्यथा एम . आय . एम . च्या वतीने आंदोलन करण्यात येईल  असे निवेदनात नमुद केले आहे.


यावेळी एमआयएमचे नेते ॲड. गफरुल्ला हाश्मी, तालुका प्रमुख सय्यद मुजफ्फर , अली इनामदार,  आर एम शेख यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ