उस्मानाबाद) लोकसभा मतदार संघ अंतर्गत येणाऱ्या औसा विधानसभा मतदार संघातील औसा तालुक्यातील गावांमध्ये राबविण्यात येत असलेल्या विविध योजना व विकास कामांचा आढावा घेण्याबाबत आज प्रशासकीय इमारत, औसा येथे प्रशासनाच्या सर्व अधिकाऱ्यांसमवेत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी बैठक घेतेली .
औसा तालुक्यातील विविध विकास कामांचा आढावा घेतला. प्रामुख्याने तालुक्यासह जिल्ह्यातील विकासाची आणि लोकोपयोगी कामे करत असताना अधिकारी वर्गाने कायद्यामध्ये असणाऱ्या नियमाला समांतर मार्ग काढून ज्यातून नियमाचे उल्लंघन न होता लोकांचे कामे झाली पाहिजेत या पद्धतीने काम करावे असे सांगितले. तालुक्यातील रखडलेले प्रश्न एकमेकांच्या संवादातून तातडीने मार्गी लागावीत व विकास कामांना योग्य दिशा देता यावी या उद्देशाने जनता, लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्यासमवेत जनतेच्या अडीअडचणी आणि तक्रारी ऐकून घेऊन त्यातील बरेच प्रश्न तत्काळ मार्गी लावले. अधिकाऱ्यांनी लोकोपयोगी कामे करत असताना कामाबाबतचे पत्र पाठवून काम होत नसते मात्र त्यानंतर वेळोवेळी त्या कामाचा पाठपुरावा करून काम प्रगतिपथावर आहे कि नाही याची माहिती करून घेतली पाहिजे.
औसा तालुक्यातील विविध समस्या ऐकून घेत असताना तालुक्यामध्ये प्रामुख्याने शेतरस्ते आणि महावितरण या विभागांच्या समस्या मोठ्या प्रमाणे आढळून आल्या. त्या अनुषंगाने अधीक्षक अभियंता, महावितरण विभाग लातूर यांना तात्काळ दूरध्वनीद्वारे संबंधित सर्व समस्यांबाबत सूचना देऊन यामधून तात्काळ मार्ग काढणे बाबतचे निर्देश दिले. तालुक्यातील बऱ्याच गावांमध्ये लाईनमन जात नसल्यामुळे गावातील विजेच्या समस्या वाढल्याचे निदर्शनास आले त्या अनुषंगाने जो अधिकारी वर्ग आणि नोकरदार वर्ग आपल्या कामामध्ये हलगर्जीपणा करत आहेत त्यांना विनाविलंब बडतर्फ करण्याबाबतच्या सूचना संबंधितांना दिल्या.
तालुक्यातील शेत समस्यांबाबत देखील तालुक्याचे तहसीलदार यांना प्रत्येक शेतकऱ्याला नंबर बांधावरून रस्ता देण्याबाबतच्या सूचना दिल्या. तालुक्यातील घरकुलांच्या (कबाला) समस्या ऐकून घेत असताना बरेच पात्र नागरिक घरकुलाच्या यादीमध्ये नसल्याचे निदर्शनास आले याबाबत गटविकास अधिकाऱ्यांना जे पात्र नागरिक घरकुलांच्या मंजूर यादी मध्ये नाहीत त्यांची यादी करून संबंधित ग्रामसेवकांकडून सुधारित प्रस्ताव तात्काळ मागवून ते मंजुरीसाठी पाठवून देण्याबाबतचे निर्देश दिले आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री महोदयांनी देखील मी सकारात्मकपणे बोलणार असल्याचे उपस्थितांना सांगितले.
राष्ट्रीय महामार्ग ३६१ तुळजापूर ते औसा अंतर्गत येणाऱ्या मौजे उजनी, आशिव, चिंचोली (का.) या गावातील प्रलंबित कामे Over Bridge, Service Road, पथदिवे यांची कामे बाकी असून ते पूर्ण तातडीने मार्गी लावण्याबाबतच्या सूचना राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता यांना देऊन राष्ट्रीय महामार्ग चे प्रकल्प संचालक यांना दूरध्वनीद्वारे सदर रखडलेली कामे करण्याबाबत निर्देश दिले.
उन्हाळी हंगामामध्ये शेतकऱ्यांना तुषार सिंचन आणि ठिबक सिंचनाबाबत वेळोवेळी जागृती करून या योजनांबाबत माहिती द्यावी आणि ठिबक सिंचन व तुषार सिंचनाचे प्रलंबित अनुदाने वितरीत करणे आणि पोखरा योजनेंतर्गत रखडलेली कामे पूर्ण करण्याबाबतचे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले.
याप्रसंगी राज्य कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती श्री.संतोष सोमवंशी, कृषी उत्पन्न बाजार समिती औसाचे उपसभापती श्री.किशोर जाधव, खरेदी-विक्री समितीचे उपसभापती श्री.शेखर आन्ना चव्हाण, तालुकाप्रमुख श्री.सतीश शिंदे, श्री.बजरंग दादा जाधव, तहसीलदार श्री.सूर्यवंशी साहेब, गटविकास अधिकारी श्री.भुजबळ साहेब, औसा नगरपालिकेच्या मुख्याधिकारी श्रीमती.वसुंधरा फड, उपविभागीय दंडाधिकारी श्री.जतिन रहेमान यांच्यासह तालुक्यातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, तालुक्यातील सर्व यंत्रणांची संबंधित सर्व प्रशासकीय अधिकारी नागरिक युवक वर्ग उपस्थित होते.
0 टिप्पणियाँ