सरकार हे कुटुंब चालवण्यासारखं टीमवर्कने समूह भावनेने चालवायचं असतं-चंद्रकांत पाटील


सरकार हे कुटुंब चालवण्यासारखं टीमवर्कने समूह भावनेने चालवायचं असतं-चंद्रकांत पाटील

मुंबई  - आम्ही विधान परिषदेच्या सर्व जागा काढणार. नागपूर आणि पुण्याला आमचे सिटिंग आहेत. मराठवाडा पदवीधर यावेळी आम्ही काढणार. पुणे शिक्षक ही जागा आमची 2008 ला होती, 2014 ला गेली. पण ती सीट यावेळी काढणार. नव्याने आम्ही अमरावती शिक्षण मतदारसंघाची जागा काढणार असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

धुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेवर तर आमचे उमेदवार सिटिंगच होते. धुळे महापालिका, धुळे जिल्हा परिषद आमच्या ताब्यात आहे. त्यामुळे धुळे जिंकण्यात काही अडचण नाही. सहा जागा आम्ही काढणार. गेल्या वर्षभरापासून राज्य सरकारचा गोंधळ चालला आहे त्यावर पहिल्यांदा लोकांना मत व्यक्त करण्याची संधी मिळाली आहे. लोक यांच्याविरोधात मत व्यक्त करणार असं चंद्रकांत पाटील म्हणाले.दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला. 

राज्य सरकारमध्ये कुठलाही ताळमेळ नाही. सरकार हे कुटुंब चालवण्यासारखं टीमवर्कने समूह भावनेने चालवायचं असतं. फक्त एकच विषय नाही, तर मराठा आरक्षणापासून अनेक विषय आहेत. प्रत्येक विषयाबाबत सरकारमधील एक मंत्री एक बोलतो तर दुसरा काहितरी वेगळं म्हणतो. मराठा आरक्षणाबाबत गोंधळ आहे. शाळा उघडण्याबाबत एकाने म्हणायचं शाळा दिवाळीनंतर उघडणार तर दुसरा म्हणतो एवढ्या लवकर उघडणार नाही. सगळ्याच विषयांमध्ये मंत्र्यांमध्ये जो ताळमेळ नाही. 

एखादी घोषणा करण्याआधी त्याची सर्व पूर्व तयारी झाली पाहिजे. ती पूर्वतयारी नसते”,अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.शेतकऱ्यांना 10 हजार हेक्टरची घोषणा झाली. मुळात 25 ते 50 हजार हेक्टर मदतीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा होती. त्याचे निम्मे पैसे दिवाळीपूर्वी देण्याची घोषणा झाली. पण निम्मे पैसे आलेच नाहीत असंदेखील पाटील म्हणाले.


एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ