बांधकाम कामगारांची होणारी पिळवणूक थांबविण्याची मागणी

 उस्मानाबाद दि.१८ ( प्रतिनिधी ) - बांधकाम कामगारांना सेफ्टी किट व साहित्य पेटी वाटपात करण्यात येणारी कामगारांची पिळवणुक व आर्थिक लुट तात्काळ थांबविण्यात यावी अशी मागणी एल्गार जनरल कामगार संघटनेच्यावतीने एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे  करण्यात आली आहे.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार व इतर कामगार कल्याणकारी मंडळ , उस्मानाबाद या कार्यालयात नोंदणीकृत असलेले बांधकाम कामगारांना सध्या सेफ्टी किट व साहित्य पिटी वाटप होत आहे. त्या किट वाटपसाठी बांधकाम कामगारांकडून एजंटद्वारे व काही संघटनेमार्फत आर्थिक लुट होत आहे . एका कामगाराकडून एक सेफ्टी किटसाठी एक हजार रुपये घेऊन कामगारांचे शोषण करुन भष्टाचार झाला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी अशा भष्ट एजंट व संघटना यांच्यावर तात्काळ आळा घालावा व गांभीर्याने कसून चौकशी करुन या संबंधीवर गुन्हे दाखल करण्यात यावेत अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. यावर जिल्हाध्यक्ष अब्दुल वहीद शानूर सय्यद, सर्जेराव कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष नंदकुमार मनाळे, महिला जिल्हा उपाध्यक्ष अलका गौरकर, तालुकाध्यक्ष सरफराज शफिक पटेल, सय्यद, सहचिटणीस सुधाताई झेंडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ