शाखेमध्ये गावातील प्रत्येक व्यक्तीच्या समस्या सोडवाव्यात- जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने.




शाखेमध्ये गावातील प्रत्येक व्यक्तीच्या समस्या सोडवाव्यात- जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने. 

निलंगा:-( प्रतिनिधी )
निलंगा तालुक्यातील शेडोळ, निटुर, अंबुलगा, व हलगरा या जिल्हा परिषद सर्कलमध्ये शाखा संघटन व पक्ष संघटनेसाठी लातूर जिल्ह्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांनी बैठक घेऊन प्रत्येक गावातील शाखाप्रमुखानी आपल्या शाखेच्या माध्यमातून गावातील सर्व लोकांचे प्रश्न सोडवावेत असे आदेश दिले.
निलंगा तालुक्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रत्येक गावामध्ये "गाव तिथे शाखा घर तेथे शिवसैनिक" या संकल्पनेच्या माध्यमातून निलंगा तालुक्यातील शेडोळ, निटूर, अंबुलगा व हलगरा या जिल्हा परिषद सर्कलमध्ये बैठका घेऊन प्रत्येक गावातील शाखा प्रमुखांनी शाखा स्थापन करावे व गटप्रमुखापासून ते शाखाप्रमुखापर्यंत प्रत्येकाने सामान्य नागरिकाचे काम करावे व शाखेच्या माध्यमातून गावातील प्रत्येक शेतकरी,शेतमजूर, वृद्ध महिलाच्या पगारी, रेशन कार्ड इत्यादी विविध समस्या कशा सोडवाव्यात याविषयी मार्गदर्शन केले. याप्रसंगी शिवसेनेचे तालुकाप्रमुख अविनाश दादा रेशमे, लातूरचे तालुकाप्रमुख बाबुराव शेळके,लातूरचे माजी नगरसेवक सुनील बसपुरे, औशाचे तालुका संघटक रोहित गोमदे पाटील, शहर संघटक हरिभाऊ सगरे, युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा.आण्णासाहेब मिरगाळे,तालुकाप्रमुख प्रशांत वांजरवाडे, लायकापाशा शेख, सोपान लोहरे, सुग्रीव सूर्यवंशी,जगदीश पाटील, बालाजी सगर,शिवाजी शिंदे, मनोज तांबाळे इत्यादी शिवसैनिक बैठकीला हजर होते.

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ