सुपर मार्केट व किराणा दुकानातून वाईन विक्रीचा शासन निर्णय रद्द करा - भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन (न्यास) महाराष्ट्रची मागणी...
एस ए काझी
औसा /प्रतिनिधी : - महाराष्ट्र सरकारने नुकताच सुपरमार्केट व किराणा दुकानातून वाईन(दारु, मद्य) विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. तो निर्णय महाराष्ट्राच्या जनतेसाठी दुर्दैवी असून याबाबत राज्य सरकारने हा निर्णय शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतल्याचे सांगत आहे मात्र हा निर्णय शेतकरी हिताचा नाही तर दारूची व्यासाने वाढदिणारा आहे तो राज्य सरकारने घेतलेला निर्णय तात्काळ रद्द करावा अशी मागणी भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन (न्यास) महा. औसा शाखेने केली आहे.
याविषयी माहिती की, भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन (न्यास) महा. औसा शाखेने दि. 3 फेब्रुवारी गुरुवारी रोजी दुपारी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे की, लोकांना व जनतेला व्यसन व आमली पदार्थापासून मुक्त करण्यासाठी काही नवीन कायदा तयार करण्यात यावा. राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेला हा निर्णय चुकीचा असून तो केवळ आर्थिक फायद्यासाठी केला आहे. मद्यपान आणि व्यसनी, दारुड्याना सरकारने याला एक प्रकारे रान मोकळे करून देणारा हा निर्णय आहे, तो चुकीचा निर्णय आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी बरेच काही योजना, लाभ, निर्णये असून केवळ वाइन (दारू) मद्यपानातून हा निर्णय घेणे हा लोकांचे हित जपण्याचा निर्णय हा घातकी आहे यात जनता व लोक तसेच तरुण युवक पिढी, अल्पवयीन मुलांची पिढी, व्यसनाधीन होऊन बरबाद होण्याच्या मार्गावर असून शासनाने हा घेतलेला निर्णय तात्काळ रद्द करावा असा आशयाचे निवेदन औसा तहसिलदारांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. या निवेदनावर तालुकाध्यक्ष म. युनूस चौधरी, शहराध्यक्ष सुनील उटगे, अशोक देशमाने. ॲड. संतोष म्हेत्रे, बनसोडे यु डी, हरिभाऊ कुलकर्णी यांच्या निवेदनावर सह्या आहेत
0 टिप्पणियाँ