" पहले हिजाब, फिर किताब " शालेय मुस्लीम विद्यार्थिनींनी हिजाब बंदीचा निषेध.
एस ए काझी
औसा/ प्रतिनिधी : - कर्नाटक राज्यामध्ये उड्डपी जिल्ह्यातील पीयू कॉलेज मध्ये मुस्लिम मुलींना हिजाब घालून प्रवेश करू नये असे कॉलेज प्रशासनाने सांगितले. यामुळे आता हिजाब वरून वाद निर्माण झाला असून कर्नाटकात काही जातीयवादी हे
हिजाब वादाला समर्थन देत आहेत. यामुळे कर्नाटक राज्यात शालेय "मुलींचा छळ केला जात आहे. त्यांना परीक्षेच्या २ महिने आधी शाळांमध्ये प्रवेश नाकारला जात असल्याने व
उडुपीमधील मुस्लिम विद्यार्थिनींनी हिजाब परिधान करण्यावर घातलेल्या बंदीबाबत, महाविद्यालयीन अधिकाऱ्यांचा यासंदर्भात याविषयीच्या कृत्याचा निषेध नोंदवत औसा शेर-ए-हिंद टिपूसुल्तान रह. युवा प्रतिष्ठाण तर्फे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांना औसा तहसीलदारांमार्फत आज 8 फेब्रुवारी मंगळवार रोजी निवेदन देण्यात आले.
कर्नाटकातील उडुपी येथील दोन महाविद्यालयांनी मुस्लिम विद्यार्थिनींना हिजाब घालण्यास बंदी घातल्यानंतर या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला आहे. हिजाब परिधान करण्यावरून 5 फेब्रुवारी रोजी कर्नाटकातील कलबुर्गी येथील डीसी कार्यालयासमोर हिजाब परिधान विषयी आंदोलन, करण्यात आले होते "आतापर्यंत प्रत्येकजण ते परिधान करत होते. आता हिजाबचा रंग बदलण्यावरही यात राजकारण आणले जात आहे. त्या अंतर्गत सर्व शाळांनी राज्य सरकारने ठरवून दिलेला गणवेश पाळावा, तर खासगी संस्थांच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या व्यवस्थापनाने ठरवून दिलेला ड्रेस कोड पाळावा, असे म्हटले होते. समानता, अखंडता आणि सार्वजनिक सुव्यवस्थेचे उल्लंघन करणाऱ्या कपड्यांवर बंदी घालण्यात येईल, असे त्यात म्हटले आहे. सरकारने कर्नाटक शिक्षण कायदा, 1983 चे 133(2) लागू केले, ज्यात असे म्हटले आहे की एकसमान शैलीचे कपडे अनिवार्यपणे परिधान केले पाहिजेत.आमदार कनीज फातिमा आणि त्यांच्या समर्थकांनी याचे समर्थन केले आहे. यासंदर्भात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना औसा तहसीलदारांमार्फत निवेदन दिले यावेळी औसा शेर ए हिंद टिपू सुलतान रह. युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अँड.सय्यद मुस्तफा इनामदार, जिल्हाध्यक्ष इलहाज पटेल, उमर पंजेशा, नागेश मुंगळे, मोईनोद्दीन शेख, आनंद बनसोडे, खाजा शेख, जावेद शेख, नदीम शेख, समीर शेख, शुजाहत काझी, इरफान शेख, अरबाज काझी, असिफ तांबोळी यांच्यासह आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते..
0 टिप्पणियाँ