शेतकऱ्यांना खरीप पेरणीसाठी महाबिज कंपनीचे ॲानलाईन केलेले बियाणे वाटप करा.एम आय एम ची मागणी
औसा प्रतिनिधी
औसा तालुक्यातील व शहरातील शेतकऱ्यांनी महाबिज कंपनीच्या बियाण्यासाठी शासनाच्या नियमानुसार आपल्याकडे ॲानलाईन अर्ज केला आहे.त्याला अद्याप एक महिना ओलांडला असून किंचित लोकांना मॅसेज आलेले आहेत. व बहुतांश शेतकऱ्यांना अद्याप मॅसेज आलेला नाही. पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांना पेरणीसाठी शासनाच्या विश्वासू असलेली महाबिज कंपनीवर विश्वास आहे. मागील वर्षीही अनेकांना बियाणे वेळेवर मिळालेली नव्हती त्यामुळे बरेचशे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. तरी सन 2022 खरीप पेरणीसाठी महाबिज कंपनीचे लागणारे ॲानलाईन केलेले बियाणे शेतकऱ्यांना तातडीने वाटप करण्यासाठी कृषी सेवा केंद्र यांना आदेशीत करावे. या मागणीचे निवेदन दिनांक 28 जुन मंगळवार रोजी औसा तहसिलदार व तालुका कृषी अधिकारी यांना एम आय एम चे औसा प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांनी निवेदन दिले आहे.या निवेदनावर त्यांची स्वाक्षरी आहे.
0 टिप्पणियाँ