शाळेच्या पहिल्याच दिवशी दुर्दैवी घटना; स्कूल बस खाली सापडून विद्यार्थ्याचा मृत्यू...

शाळेच्या पहिल्याच दिवशी दुर्दैवी घटना; स्कूल बस खाली सापडून विद्यार्थ्याचा मृत्यू...

NEWS 24 LATUR

 प्रतिनिधी : पुणे :

कोरोना महामारीमुळे राज्यातील सर्व अस्थापणे बंद झाली होती. यात सर्वाधिक काळ राज्यातील शाळा आणि महाविद्यालय बंद होती. हळूहळू कोरोना विषानूचा प्रादुर्भाव कमी झाल्याने, शिक्षण विभागाकडून या वर्षी प्रत्यक्षात वर्ग सुरू करण्यात आले आहेत. तर मागील 2 ते 3 वर्षाच्या प्रतिक्षेनंतर आज प्रत्यक्ष शाळा, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सुरू होत असल्याने शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. परंतु, पुणे शहरात शाळेच्या पहिल्याच दिवशी अत्यंत दुःखद घटना घडली असून, स्कूल बसच्या चाकाखाली येऊन एका 12 वर्षीय चिमुकल्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे.

सदर घटना सिंहगड रोड वरील वडगाव खुर्द येथे घडली असून, अर्णव अमोल निकम (वय 12) रा. राजयोग टाऊनशिप, वडगाव खुर्द असं या अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्लॉसम पब्लिक स्कूलची बस विद्यार्थ्यांना सोडविण्यासाठी सोसायटीत दुपारच्या सुमारास आली असता; बसमधून अर्णव आणि इतर विद्यार्थी उतरले. त्यानंतर बस वळत असताना मागच्या चाकाखाली सापडून अर्णवचा मृत्यू झाला. तर या घटनेनंतर इतर विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. घटनेची माहिती मिळताच सिंहगड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे, गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे, उपनिरीक्षक किशोर तनपुरे यांनी घटनास्थळी भेट दिली असून, बस चालक दत्तात्रय लक्ष्मण परेकर (वय 49) रा. धनकवडी आणि वाहक रिया जाधव (वय 33) रा.नऱ्हे यांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ