NEWS 24 LATUR प्रतिनिधी- पुणे :
राज्यातील शाळा आजपासून सुरु
झाल्या असून, कोरोनानंतर प्रत्यक्ष वर्ग भरल्याने विद्यार्थ्यांसह
शिक्षकांच्या चेहऱ्यावर उत्साह दिसून येत आहे. कोरोना
महामारीमुळे राज्यातील सर्वच शाळा ऑनलाईन सुरु होत्या; तर
शाळा सुरू होण्या अगोदर पुन्हा एकदा कोरोना विषाणूच्या
नव्या व्हेरियंट ने हळूहळू डोकं वर कडल्याने, शिक्षक, विद्यार्थी
आणि पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.
परंतु, अखेर आज पोसून शाळेची घंटा वाजली असून, विद्यार्थ्यांसह शिक्षकांच्या चेहऱ्यावर उत्साह दिसून येत आहे.
खर तर शाळा जरी 13 जून रोजीच सुरू झाल्यात.! परंतु, विद्यार्थ्यांना 15 जून रोजी प्रत्यक्ष शाळेत बोलावलं जावं, असं शिक्षण विभागाच्या आदेशात म्हटले होते. त्यानुसार आज उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर शाळेची पहिली घंटा वाजली आहे. आजपासून राज्यातील सगळ्या एसएससी बोर्डाच्या शाळा सुरु झाल्या आहेत. पहिली ते दहावीच्या शाळा आजपासून सुरु झाल्यात. सकाळच्या सत्रात आणि दुपारच्या सत्रात अशा शाळा सुरु होत आहेत. सकाळच्या सत्रातील शाळांमध्ये आज विद्यार्थ्यांचे शिक्षकांकडून स्वागत करण्यात आले.
दरम्यान, आजपासून राज्यातल्या शाळा सुरु झाल्या तरी पाठ्यपुस्तकांचा तुटवडा असल्याचं समोर आले आहे. विशेषतः इंग्लिश आणि सेमी इंग्लिश माध्यमांची पुस्तकं मिळालेली नाहीत. काही शाळांनी पालकांकडून पैसे घेतले आहेत. मात्र, पुस्तके देण्यात आलेली नाही. बालभारतीकडे वारंवार विचारणा करूनही पुस्तकं उपलब्ध होत नसल्याची तक्रार विक्रेत्यांकडून करण्यात आली आहेत. तर पुस्तकंच नसतील तर मुलांना शाळेत पाठवून फायदा काय, असा सवाल पालकांनी विचारला आहे. महाराष्ट्रातील इयत्ता 1 ते 12 च्या शाळा आजपासून कोविड-19 प्रोटोकॉलसह पुन्हा सुरु केल्या जाणार आहेत, असे महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी गेल्या आठवड्यात सांगितले.
0 टिप्पणियाँ