पिंपरी येथील नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत द्यावी

पिंपरी येथील नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत द्यावी



धाराशिव दि.२४ (प्रतिनिधी) - धाराशिव तालुक्यातील पिंपरी (बे) येथे चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झाले असून अनेक जणांच्या घरावरील पत्रे उडालेली ते बेघर झालेले आहेत. त्यामुळे त्यांचा संसार उघड्यावर आला असून या नुकसानीचे पंचनामे करुन त्यांना आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय बहुजन ओबीसी अल्पसंख्याक भ्रष्टाचार निर्मूलन असोसिएशनच्यावतीने एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे दि.२४ मे रोजी केली आहे.


दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, धाराशिव तालुक्यातील पिंपरी येथे सक्रिय वादळाचा मोठा पाऊस झाल्यामुळे ७० ते ८० घरात वरील पत्रे वाऱ्याने उडून गेले आहेत. त्यांच्या निवाऱ्याची व्यवस्था करून द्यावी. तसेच शेतीचे नुकसान झाले असून नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून त्यांना आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष सय्यद कलीम मुसा यांनी केली आहे.

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ