कासार शिरसी पोलीस स्टेशन पुन्हा एकदा जिल्ह्यात सर्वप्रथम
(सपोनि- रियाज शेख, पोकॉ/ बालाजी बन यांची उत्कृष्ट कामगिरी)
लातूर जिल्हा पोलीस दलाकडून दर महिन्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस स्टेशनची निवड करून त्यांना मा पोलीस अधीक्षक लातूर श्री. सोमय मुंडे सर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात येतात.
माहे एप्रिल/2024 या महिन्यामध्ये, पोलीस खात्यातील ऑनलाईन कामकाज साठी अस्तित्वात असलेल्या सीसीटीएनएस प्रणालीमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करून लातूर जिल्ह्यातून सर्वप्रथम आल्या बद्दल उद्या दिनांक 28/04/2024 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय लातूर येथे घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमात कासार शिरसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. रियाज मुनीर शेख व पोलीस अंमलदार बालाजी रामराव बन यांचा मा. पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे सर, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. अजय देवरे सर यांचे हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे.
सदर सीसीटीएनएस प्रणाली कामकाजामध्ये पोलीस स्टेशन कासार शिरशीचे अंमलदार बालाजी बन यांनी उत्कृष्ट कामगिरी करून सर्व डेटा फीडिंग सीसीटीएनएस मध्ये केलेली होती.
कासार शिरसी पोलीस स्टेशनला प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल निलंगा पोलीस उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर नितीन कटेकर सर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
कासार शिरसी पोलीस स्टेशन कडून मागील कालावधीत उत्कृष्ट कामगिरी होत असल्याने बऱ्याच वेळा उत्कृष्ट प्रतिबंधक कारवाई, उत्कृष्ट समन्स बजावणी, उत्कृष्ट वॉरंट बजावणी, CCTNS डेटा फिडिंग इत्यादी बाबतीत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळाला आहे..
0 टिप्पणियाँ