वनविभागाची भूमिका हाथाची घडी आणि तोंडावर बोट .
औसा आणि निलंगा तालुक्यात बेकायदेशीर वृक्षतोड माफियांनी अक्षरशः जंगलात धुमाकूळ घातला असून, दिवसाढवळ्या शेकडो झाडे तोडून आरा गिरण्यांकडे पोहोचवली जात आहेत. वनविभागीय अधिकाऱ्यांच्या संशयास्पद भूमिकेमुळे आणि शांततेमुळे हा गोरखधंदा बिन बोभाट सुरू असल्याची नागरिकांमध्ये चर्चा असून, यामागे मोठे आर्थिक मंथली मिलीभगत असल्याचा आरोप होत आहे.
काही ठिकाणी रात्री नव्हे तर दिवसाढवळ्या ट्रॅक्टर-ट्रॉली, ट्रकद्वारे लाकूड वाहतूक होते. तरीही, तपासणी चौक्या, रस्ते आणि गावे पार करताना कुठेही अडथळा येत नाही. “हा सगळा खेळ अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाशिवाय कसा काय चालू शकतो?” असा जळजळीत सवाल नागरीक करत आहेत.
वृक्षतोडीमुळे फक्त जंगलाचं नुकसान होत नाही, तर निसर्गाचा समतोल बिघडत आहे, भूजलस्तर कमी होत आहे, आणि पुढच्या पिढ्यांना सावली व शुद्ध हवा देणारी झाडं हिरावून घेतली जात आहेत. तरीही जबाबदार यंत्रणा मौन बाळगून आहे.
शासनाने तात्काळ हस्तक्षेप करून या माफियांना आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांना जाब विचारावा, अन्यथा लातूर जिल्ह्याचा हिरवा श्वास कायमचा गुदमरून जाईल, यावर वन विभागाने लवकरात लवकर वृक्ष तोड माफियांचा बंदोबस्त करावा अन्यथा आम्हालाच रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा वन विभागाला नागरिकांनी दिला आहे.
---
0 टिप्पणियाँ