औसा तालुक्यात अवैध गुटख्याचा धडाका – कायदाच्याच राखण दारांचे डोळे झाक ?
गुटखा माफियांचा दिवसाढवळ्या काळा बाजार, तर प्रशासन ‘गप्प’! – जनते चा संताप
औसा प्रतिनिधी –
तौफीक सत्तार कुरैशी
औसा शहर आणि तालुक्यात बंदी घातलेला गुटखा दिवसाढवळ्या विक्रीस सहज उपलब्ध होत आहे. पान टपऱ्या, किराणा दुकाने, अगदी शाळा–कॉलेज परिसरा पर्यंत हा घातक जहर पोहोचत आहे. तरुणांच्या खिशात सहज शिरणारा हा विषारी पदार्थ त्यांच्या आरोग्याचा घड्याळ वेगाने मागे नेत असून, कॅन्सर सारख्या भीषण आजारांचा धोका वाढवत आहे.
शहरातील सर्वाधिक धक्कादायक चित्र म्हणजे फेरी वाले आणि दुचाकीवर फिरणारे गुटखा विक्रेते – हे लोक जवळ जवळ प्रत्येक किराणा दुकाना समोर थांबून खुलेआम गुटखा विकतात. ना लपवा छपवी, ना भीती! जणू कायदा यांच्यासाठी अस्तित्वातच नाही.
स्थानिक नागरिक सांगतात की, “हे दृश्य रोज पाहतो, पण त्यांच्यावर कारवाई करणारा कोणी नाही. पोलिसांना सर्व माहिती असूनही, ते जणू अनभिज्ञ असल्याचे नाटक करतात की मग गुटखा माफियांना थेट संरक्षण देतात ?” असा सवाल जनता करत आहे.
राज्य सरकारने गुटखा विक्रीवर बंदी लागू केल्याचा फक्त कागदी पुरावा उरला आहे. जमिनीवर मात्र गुटखा माफियांचे साम्राज्य फोफावत आहे. अन्न–औषध विभाग, प्रशासन आणि पोलीस यांची निष्क्रियता इतकी वाढली आहे की, गुटखा विक्रेत्यांचा दरारा एवढा वाढला आहे की, कोण कारवाई करण्याची हिंमत करत नाही.
या मागे मोठ्या रकमेचा व्यवहार आणि ‘संरक्षणाचा हात’ असल्याची चर्चा जनतेत जोरात आहे. आरोग्याशी खेळणाऱ्या या काळ्या कारभारावर तातडीने धडक कारवाई न झाली, तर औसा तालुका गुटखा माफियांच्या विळख्यात पूर्णपणे गिळंकृत होणार, यात शंका नाही.
0 टिप्पणियाँ