औसा – प्रतिनिधी
तौफीक सत्तार कुरैशी
औसा शहरात अल्पसंख्यांक समाजावर होत असलेल्या अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात भव्य मुक्त मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मोर्चा येत्या सोमवार, दिनांक 25 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10 वाजता औसा किल्ला मैदान येथून सुरू होऊन तहसील कार्यालयापर्यंत जाणार आहे.
या मोर्चात शेतकरी, व्यापारी, वाहनचालक यांच्यासह कुरेशी समाज व विविध अल्पसंख्यांक घटकांचा मोठ्या संख्येने सहभाग अपेक्षित आहे. आयोजक जमिअतुल कुर्शेश कमिटी, औसा यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा मोर्चा हा केवळ एका समाजाचा प्रश्न नसून, न्याय, हक्क आणि अस्तित्वासाठीचा संघर्ष आहे.
“अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची हीच वेळ आहे, आणि हक्कांसाठी लढण्याची हीच वेळ आहे,” असे आयोजकांनी सांगितले. तसेच औसा शहर व तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
0 टिप्पणियाँ