विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी एमटीबी महाराष्ट्रचा पुढाकार : शालेय अभ्यासक्रम सुधारणा सूचना परिषदेकडे सादर
पुणे/मुंबई :
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT) पुणे यांनी प्रसिद्ध केलेल्या प्रस्तावित शालेय अभ्यासक्रम २०२५ वर मर्कज़ी तालीमी बोर्ड (MTB) महाराष्ट्र तर्फे सविस्तर अभ्यास करून सूचना व अभिप्राय वेळेत परिषदेकडे सादर करण्यात आले.
या प्रक्रियेत शिक्षणतज्ज्ञ व विषयतज्ज्ञ शिक्षकांच्या सहभागाने इयत्ता ३ री ते ५ वी, ६ वी ते ८ वी आणि ९ वी-१० वी च्या अभ्यासक्रमाचा सखोल आढावा घेण्यात आला. रचनात्मक व तथ्याधारित सूचना अधिकृत लिंक आणि ई-मेलद्वारे पाठवण्यात आल्या. तसेच, मंडळाचे सदस्य प्रा. सय्यद जावेद आणि शाहिद खान यांनी एससीईआरटी पुणे येथील सहसंचालक डॉ. कमला देवी आउटे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आपले अभिप्राय सादर केले.
मंडळाचे अध्यक्ष प्रा. अझीझ मोहिउद्दीन यांनी सांगितले की, “अभ्यासक्रम काळाच्या गरजेनुसार व प्रत्येक मुलाच्या नैसर्गिक क्षमतेला प्रोत्साहन देणारा असावा, यासाठी एमटीबी सातत्याने प्रयत्नशील आहे. आमच्या सूचनांचा निश्चितच राज्याच्या अभ्यासक्रम सुधारण्यात उपयोग होईल.”
या कार्यात गटनेते अकील मियाँ, मुकर्रम खान (भिवंडी), आरिफ खान (मुंबई), ख्वाजा मोईनुद्दीन यांनी विशेष भूमिका निभावली. सचिव सय्यद शरीफ आणि माजी सचिव नासिर हुसेन यांनी अथक परिश्रम व समर्पणाने हे कार्य पूर्ण केले.
२७ जुलै रोजी SCERT पुणे यांनी शिक्षक, पालक, अधिकारी व शैक्षणिक संस्थांना प्रस्तावित मसुद्यावर अभिप्राय देण्याचे आवाहन केले होते. यासाठी अंतिम तारीख २७ ऑगस्ट निश्चित करण्यात आली होती.
— सय्यद शरीफ, सचिव, एमटीबी महाराष्ट्र
0 टिप्पणियाँ